धांगवडी येथे रात्रीच्या १० वाजता रास्ता रोको आंदोलन! राष्ट्रीय महामार्गाचा भोंगळ कारभार.
मुख्य संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
सातारा ते पुणे महामार्गवरील धांगवडी ब्रिजवर मोठ मोठे जीवघेण्या खड्यांमुळे गाड्यांचे टायर फुटून अपघात होत आहेत,
धांगवडी येथील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या खड्ड्यांमुळे वाहनांचे टायर फुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आरपिआय सातारा जिल्हाध्यक्ष अशोक बाप्पु गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी रविवारी दि.२६ रोजी रात्री दहा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्याच्या निर्णयाला आले आहेत.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की, प्रशासन या समस्येवर योग्य तो निर्णय घेईपर्यंत ते रस्ता रोकून ठेवतील. या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
टोल भरून देखील प्रवास दुखमय करून घ्यायचा असेल तर टोल भरून काय उपयोग❗
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी रस्त्यांच्या खड्याबाबत महत्वाचा निर्णय घेतला पाहिजे असे प्रवाpशांचे म्हणणे आहे.


