आळंदी पोलीस स्टेशन येथे तृतीय पंथी व महिला पोलीस अधिकारी यांचा सन्मान करून जागतिक महिला दिन साजरा
संपादक: दिलीप वाघमारे
महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्न महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी सुरक्षा दलाच्या वतीने आळंदी शहरात आळंदी पोलीस स्टेशन महिला पोलीस अधिकारी यांना सन्मानित करत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्न महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी सुरक्षा दल यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्त आळंदी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्या उपस्थितीत महिला उपनिरीक्षक सोनाली फुले यांना राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करत सर्व महिला अधिकारी यांना गुलाबाचे फुल देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या,कार्यक्रमाला उपस्थित पुणे जिल्हा महिला आघाडी कार्याध्यक्षाःनिलम सोनवणे,खेड तालुका महिला अध्यक्षाःस्वाती शिंदे,आळंदी शहर अध्यक्षाःप्रज्ञा पाटील,उपाध्यक्षाःयोगिता गनमोठे,सचिवःस्वाती आहेर, उषा सातपुते,आकांक्षा गायकवाड,आरोही पवार,खुशी घोडके,उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे यांनी केले,कार्यक्रमाचे नियोजन विजयकुमार शिंदे यांनी केले.


