जागतिक महिला दिनानिमित्त न्हावी येथे कचऱ्याचे बकेट वाटप.
संपादक मंगेश पवार
कार्यकारी संपादक सागर खुडे
सारोळे:- महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार,८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
जागतिक महिला दिननिमित्त न्हावी येथील महिला दिन कार्यक्रमात राजगड पोलिस स्टेशन च्या पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई व किकवी येथील १०८ इमरजेंसी मेडिकल ऑफिसर डॉ मंदार माळी यांना महिलांना कायदा व आरोग्य मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून बोलावले, त्यात महिला दिन याचे सूत्रसंचालन व माहिती ही पुनम सोनवणे यांनी केले तसेच महिला दिना निम्मित महिलांवर खूप छान विचार वकील प्रतिभा सोनवणे व बचत गट अध्यक्ष प्रियांका सोनवणे यांनी मांडले त्यानंतर मान्यवर प्रमुख मान्यवर डॉ.मंदार माळी इमरजेंसी मेडिकल ऑफिसर बीव्हीजी १०८ किकवी यांनी महिलांना आरोग्य तसेच सार्वजनिक स्वच्छता तसेच १०८ रुग्णवाहिका ह्यात देण्यात येणाऱ्या अत्यावश्यक सेवा ह्याचे महत्व सांगितले ह्या कार्यक्रमा मधे न्हावी येथील ७० ते ८० महिला उपस्थित होत्या त्यात सरपंच भरत सोनवणे उपसरपंच ह्या अध्यक्ष होत्या सीमाताई जगताप तसेच ग्रामपंचायत सदस्य संगीताताई शिंदे तसेच आशाताई चव्हाण प्रियांका सोनवणे तसेच बीव्हीजी १०८ पायलट विशाल कदम हे मान्यवर उपस्थित होते त्यानंतर महिलांना महिला दिनानिम्मित ग्रामपंचायत न्हावी तर्फे ओला कचरा व सुका कचरा ह्यासाठी कचऱ्याचे डब्बे डॉ मंदार माळी व कार्यक्रम अध्यक्ष ह्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.


