पुरंदर तालुक्यातील निळूंज गावातील एका महिलेचे नजरचुकीने तांदळाच्या हात व्यापाऱ्याकडे चार तोळे सोन्याचे दागिने गेले:-जेजुरी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत व्यापाऱ्याचा शोध घेतला.


संपादक : मंगेश पवार

कार्यकारी संपादक: सागर खुडे

ADVERTISEMENT

जेजुरी पोलीस ठाणेच्या हद्दीतील ( पुरंदर ता.) निळूंज गावातील एका महिलेचे नजरचुकीने तांदळाच्या हात व्यापाऱ्याकडे चार तोळे सोन्याचे दागिने गेले होते. कुठलाही पुरावा नसताना जेजुरी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत व्यापारचा शोध घेवुन सोन्याची दागिने माझ्याकडे सुपूर्त केले. दागिने मिळताच महिलेने पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त केले. पुरंदर तालुक्यातील निळूंज गावातील स्मिता संतोष जगताप यांनी प्लास्टिकच्या डब्यामध्ये चार तोळ्याचे सोन्याचे दागिने घरात असलेल्या तांदळाच्या पिशवीत ठेवले होते तांदळाच्या पिशवीत ठेवलेल्या सोन्याचा डब्बा व्यापाऱ्याला विक्री केलेल्या तांदळाच्या पिशवीत गेल्याचे लक्षात आले. परंतु बराच अवघी उलटल्याने अनोळखी व्यापाऱ्याला कुठे शोधायचे असा प्रश्न महिलेपुढे पुढे उभा राहिला होता. चार तोळे सोने गेल्याने निराश झालेल्या महिलेने थेट जेजुरी पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. जेजुरी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मात्र कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्ही फुटेज तसेच व्यापाऱ्याचा नंबर देखील नसल्याने पोलिसांपुढे देखील मोठे आव्हान होते. अखेर दोन दिवसात पोलिसांनी व्यापाऱ्याचा शोध घेऊन महिलेला सोन्याचे दागिने सुपूर्त केले. दागिने मिळाल्याने महिलेने पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त केले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस ठाणेचे स.पो.नि. दीपक वाघचौरे पोलीस उपनिरीक्षक पुजारी पोलीस हवालदार संदीप भापकर पोलीस हवालदार मुजावर आदीं पोलिसांनी या तपासात सहभाग घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!