डॉ. पंकज आशिया यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी म्हणून स्वीकारला पदभार, अखेर सर्व सर्वसामान्य जनतेला प्रथम न्याय देणारा जिल्हाधिकारी मिळाला,
कलावती गवळी (अहिल्यानगर जिल्हा) प्रतिनिधी . अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची साखर आयुक्त पदावर बदली झाल्यामुळे रिक्त असणाऱ्या अहिल्यानगर जिल्हाधिकारी म्हणून यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. डॉ . पंकज आशिया हे 2016 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत ते मूळचे जोधपूर (राजस्थान) येथील रहिवासी आहेत. यापूर्वी ते यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेत आल्यापासून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच असल्याचं दिसून येत आहे. गेल्या आठवड्यापासून जवळपास 50 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ऑर्डर सरकारकडून काढण्यात आली आहे. नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या बदलीपासून अहिल्यानगर जिल्ह्याला नव्या जिल्हाधिकाऱ्यांची प्रतीक्षा लागून होती. अखेर आता सर्व सामान्यांना प्रथम न्याय देणारा डॉ . पंकज आशिया हे अहिल्यानगर जिल्ह्याला जिल्हाधिकारी म्हणून लाभले आहेत. नूतन जिल्हाधिकारी हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते सदैव कटिबद्ध राहतील असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. तर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नगरकरांसाठी जिल्हाधिकारी म्हणून आपली उत्कृंष्ट सेवा दिली. सिद्धाराम सालीमठ यांचे नगरशी अगदी जुने नाते होते.*

