चैतन्य करिअर अँकँडमीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज
मुख्य संपादक:मंगेश पवार
कार्यकारी संपादक:सागर खुडे
‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ या थीमनुसार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माणखटावचे आमदार तथा ग्रामविकास मंत्री, सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनानुसार चैतन्य करिअर अँकँडमी सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र दहिवडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात जन-गण-मन राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी योग गुरु ब्रह्मकुमारी रुपाली दिदी, योग गुरु मार्गदर्शक डॉ. विनीत कुलकर्णी सर, विधानसभा प्रमुख सोमनाथजी भोसले, दहिवडी मंडळ अध्यक्ष गणेशजी सत्रे, युवा मोर्चा अध्यक्ष विशाल घोरपडे, युवा मोर्चा सरचिटणीस दिनेश काकडे आदि मान्यवर प्रमुख उपस्थितीत होते.
यांसह चैतन्य करिअर अँकँडमीचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव खाडे सर, संचालक संतोष खाडे सर तसेच आयुष खाडे सर, वैभव खाडे सर हेही उपस्थित होते. तर विद्यार्थी प्रतिनिधी अनिकेत मुळे, प्रज्योत पालवे, वैभव भवर, प्रथमेश जाधव आणि विद्यार्थीनी प्रतिनिधी श्रद्धा पवार, श्रद्धा मेलगे, वैष्णवी खराडेसह अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी योग सत्रात सहभागी रहात योग साधनेचा आनंद घेतला. वंदे मातरम् या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


