पोरींनी जग जिंकलं! भारताच्या महिलांनी रचला इतिहास, पटकावला पहिलावहिला विश्वचषक ! आपल्या लाखों चाहत्यांना दिला आनंद,
संभाजी पुरीगोसावी
भारतीय महिला क्रिकेट संघाने आजवरचे सगळे विक्रम मागे टाकत अत्यंत मोठा इतिहास रचला आहे. विश्वचषकांचा आज (2 नोव्हेंबर) अंतिम सामना पार पडला. ज्यामध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत विश्वचषक 2025 किताब पटकावला आहे. हा अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मजबूत संघाला 52 धावांनी पराभूत करून भारताच्या महिला संघाने आपला पहिला विश्वचषक जिंकला आहे. मागील अनेक वर्षांपासून महिला भारतीय संघ जे स्वप्न पाहत होतं ते अखेर पूर्णता झालं आहे. हा विजय केवळ एक सामना नव्हता तर भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील एक मोलाचा दगड आहे. ज्याने आज लाखोंच्या चाहत्यांना आनंदाची उभारी दिली आहे. शेफाली वर्माने 87 धावांची अमूल्य खेळी तर साकारलीच पण त्याचबरोबर तिने भारताला गरज असताना विकेट्स मिळवून दिल्या त्यामुळे हा सामना चांगलाच रंगतदार झाला आहे. शेफालीच्या जोरावर भारताने 298 धावा उभारल्या होत्या. भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी नमवले अखेर वर्ल्ड कप जिंकला आहे. या सामन्यामुळे अनेक चाहत्यांनी फटाके वाजवून तसेच आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवून आनंद व्यक्त केला आहे.

