माना (मूर्तिजापुर) पोलिसांची धडक कारवाई… दारू अड्ड्यांवर धाडी 65 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..!!
संभाजी पुरीगोसावी
(अकोला जिल्हा) प्रतिनिधी. माना पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये कुरुम साप्तवाडा व जामठी बुद्रुक) येथील चार ठिकाणी धाड टाकून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जवळपास 65 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई 31 ऑक्टोबर रोजी माना पोलिसांनी केली आहे. चारही आरोपींवर यापूर्वी माना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे सध्या माना पोलीस ठाणेच्या परिसरांतील अवैध धंदे वाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चीत चांडक अप्पर पोलीस अधीक्षक चंदकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली माना पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार श्रीधर गुटटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन सहाय्यक फौजदार राजेंद्र वानखडे पोहेका. मनोहर इंगळे संदीप सरोदे उमेश हरमकार पोकों सुशील आठवले जावेद खान आकाश काळे आणि महिला पोकों जयश्री गाडे यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.


