लोणंद – पंढरपूर ते घुमाण रथ व सायकल यात्रेचे लोणंदनगरीत उत्साहात स्वागत


दिलीप वाघमारे

*लोणंद ( प्रतिनिधी ) – भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव समाजोन्नती परिषद व समस्थ नामदेव शिंपी समाज यांच्यावतीने आयोजित केलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) या संत नामदेव महाराज रथ व सायकल यात्रेचे लोणंद नगरपंचायत पटांगणावर लोणंद नगरीच्या वतीने स्वागत करण्यात आले .

*या भव्य रथ व सायकल यात्रेचे प्रमुख व महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुर्यकांत भिसे व विणेकरी , सायकल पटू यांचा सत्कार करण्यात आला .

*यावेळी नगराध्यक्षा मधुमती गालींदे ,उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी , सपोनि सुशील भोसले ,नगरसेवक सचिन शेळके , दिपाली निलेश शेळके , रवींद्र क्षीरसागर भरत बोडरे ,सागर शेळके , संदीप शेळके , सागर गालिंदे ,हर्षवर्धन शेळके ,राहुल घाडगे ,

ADVERTISEMENT

रिटायर्ड ॲडिशनल एस पी राजेंद्र शेळके रिटायर्ड जिल्हा कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके ,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद खरात , खंडाळा तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मस्कु आण्णा शेळके ,सुनील यादव , राजेश शिंदे ,रोहित निंबाळकर ,बाळकृष्ण भिसे , वसंत पेटकर ,लोणंद शिंपी समाज संघटनेचे अध्यक्ष मनोज बारटक्के, लोणंद शहर नाभिक संघटनेचे अध्यक्ष बबलू पवार , किसनराव शेळके ,श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपचे शंभूराजे भोसले , रवींद्र धायगुडे , भानुदास क्षीरसागर ,विजय ढुमे , आनंदा पाडळे , धन्यकुमार भांडवलकर आदी मान्यवर उपस्थित होते *

स्वागत कार्यक्रमाचे नियोजन पालखी सोहळा पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष पत्रकार शशिकांत जाधव , रमेश धायगुडे , ज्ञानेश्वर ससाणे , राहीद सय्यद , गणेश भंडलकर , दिलीप वाघमारे , बाळ लोणंदकर व सहकाऱ्यांनी केले .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!