डॉ. मंदार माळी यांची शिव प्रहार प्रतिष्ठानच्या पदावर नियुक्ती
मंगेश पवार
सारोळे : शिव प्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने किकवी येथील साई हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार सुरेश माळी यांची वैद्यकीय आघाडी अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र संस्थापक अध्यक्ष संतोष ज्ञानोबा मोहिते यांनी ८ मार्च २०२६ रोजी दिले.
डॉ. माळी हे गेल्या अनेक वर्षांपासून किकवी परिसरात आरोग्य सेवा व सामाजिक कार्य करत असून त्यांच्या कार्याची दखल घेत शिव प्रहार प्रतिष्ठानतर्फे त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे संस्थेने सांगितले.
समाजातील ज्वलंत समस्यांवर न्याय मिळवून देणे तसेच संस्थेचे ध्येय-धोरण व समाजहिताचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सदर नियुक्ती एक वर्ष कालावधीसाठी असून त्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील मुदतवाढ देण्यात येणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या नियुक्तीबद्दल किकवी परिसरातील अनेक मान्यवरांनी डॉ. मंदार माळी यांचे अभिनंदन केले. यामध्ये अमोल शिळीमकर (विद्यमान सरपंच), रोहित शिळीमकर, विराज शिळीमकर, जयदीप शिळीमकर आणि प्रसाद शिळीमकर यांचा समावेश आहे.


