कापूरहोळ येथे ट्रॅव्हल्समधून प्रवाशाचे 4.50 लाखांचे मंगळसूत्र चोरीला


कापूरहोळ येथे ट्रॅव्हल्स थांबविल्यानंतर लेडीज पर्समधून सुमारे 4 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौरभ राजेंद्र भोसले (वय 29) हे सध्या तळेगाव मोहोळ (ता. मावळ, जि. पुणे) येथे राहतात. दिनांक 2 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 11.50 वाजता कापूरहोळ येथील हॉटेल सह्याद्री येथे ट्रॅव्हल्स थांबली असताना ते व त्यांची पत्नी वॉशरूमसाठी खाली उतरले होते. त्यावेळी ट्रॅव्हल्समध्ये ठेवलेल्या लेडीज पर्समधून टेम्पल ज्वेलरी प्रकारातील सुमारे तीन तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेले. या मंगळसूत्राची किंमत अंदाजे 4,50,000 रुपये असल्याचे सांगितले आहे.

ADVERTISEMENT

या घटनेप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 102/2026, BNS 303(2) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निंबाळकर करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!