शाळकरी मुलांच्या सुरक्षेसाठी प्रशासन पुढे सरसावलं! ‘पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज’च्या बातमीचा परिणाम.
मेट पिलावरे (ता. राजगड) – मुसळधार पावसामुळे भरून वाहणाऱ्या ओढ्यामुळे जोरकर वस्तीतील शाळकरी मुलांसह नागरिकांचे हाल सुरू आहेत. ओढा ओलांडणे कठीण झाल्याने मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. या परिस्थितीची गंभीर दखल घेत महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट दिली.
शाळकरी मुलांना व नागरिकांना सुरक्षितपणे जाण्या-येण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून बांबूंच्या लाकडांचा आधार करून पूल उभारण्यात आला आहे. मात्र कायमस्वरूपी सोयीसाठी पक्का पूल बांधण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
“पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज” मध्ये दिनांक 19 ऑगस्ट रोजी ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरच प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. आपल्या बातमीचा थेट परिणाम म्हणूनच कालपर्यंत धोकादायक असलेल्या या ओढ्यावर आज तात्पुरत्या पुलाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच पक्का पूल बांधण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.