सातारकरांनो, गणेशोत्सव उत्सव साजरा करताय, तर ( लेझर लाईट ) वर पूर्णता बंदी:- उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करणार – पोलीस अधीक्षक तुषार दोशी..!!


संगीता इनकर  (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सातारा जिल्ह्यात आगामी गणेशोत्सव हा साजरा होत असून. त्या अनुषंगाने तीव्र प्रकाश यंत्रणेवर ( लेझर लाईट ) पूर्णता: बंदी घालावी असे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. या लेझर लाईट मुळे अनेकांच्या डोळ्यांना गंभीर इजा होत असल्याचे अनेकदा दिसून आले असल्याने यावर बंदी घालावी असे देसाई यांनी सांगितले आहे. याचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत पोलीस प्रशासनाला दिले आहेत. गणेशोत्सव सन 2025 तयारीचा आढावा पालकमंत्री  देसाई यांनी नुकताच घेतला आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह सर्व तहसीलदार नगर,पालिकेचे मुख्याधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी उपवनसंरक्षक अमोल सातपुते आदींची उपस्थिती होती. आगामी गणेशोत्सव,आगमन व विसर्जन मिरवणुकीत प्लाझ्मा,बीम लाईट लेझर बीम लाईट व प्रेशरमीडच्या वापरांवर सातारा जिल्हा प्रशासनाने पूर्णता: बंदी घातली असून. घालण्यात आलेल्या निर्बंध आदेशांचे उल्लंघन केल्यास तातडीने गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशाराही जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी दिला आहे. सातारा जिल्ह्यात 8 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत गोकुळाष्टमी दहीहंडी गणेशोत्सव आगमन,विसर्जन असे सण साजरे होत आहेत. या उत्सवांमध्ये मिरवणुकी वेळी गणेश मंडळे त्यांच्या वाद्यांमध्ये व स्टेरिओ सिस्टीम मध्ये प्लाझ्मा लाईट,लेझर बीम लाईट व प्रेशरमडिचा वापर करतात. या प्लाझ्मा बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे व कर्णकर्कश आवाजामुळे श्रवण यंत्रणावर डोळ्यांवर हृदयांस इजा होते. तसेच आरोग्यावरही धोका निर्माण होतो. तसेच रस्त्यावरून वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघातही घडू शकतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा सारासार विचार करून आगामी सण उत्सवांच्या कालावधीत लेझर लाईटच्या वापरांवर पूर्णता: निर्बंध घालण्यात आले आहेत. मिरवणुकी दरम्यान अशा प्रकारची विद्युत उपकरणे निदर्शनास आल्यास संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल केले जाणार आहेत असा इशाराही जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिला आहे. आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाची जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांवर करडी नजर असणार आहे. त्यामुळे गणेश मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून आगामी सण उत्सव आनंदात साजरे करावेत असे देखील आव्हानही जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!