शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 सुरू


मंगेश पवार

भोर: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने पहिल्या बॅचचे तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान विद्या प्रतिष्ठान इंग्लिश स्कूल भोर येथे आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, राज्य अभ्यासक्रम आराखडा(पायाभूत व शालेय शिक्षण स्तर), शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, क्षमता आधारित प्रश्ननिर्मिती, समग्र प्रगती पत्रक या विषयावर प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

 

प्रशिक्षणाच्या पहिल्या बॅचच्या उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती भोरचे उच्चश्रेणी गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे साहेब, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे साहेब, विस्तार अधिकारी हुमेरा परवीन शेख, विषय साधनव्यक्ती व प्रशिक्षण समन्वयक सुनील गोरड, विद्या प्रतिष्ठानच्या प्राचार्य अश्विनी मादगुडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक श्री सुनील गोरड सर यांनी केले. सूत्रसंचालन शीला घोडके व आभार महादेव मांदळे यांनी मानले. या प्रशिक्षणासाठी तज्ञ सुलभक म्हणून रेखा पाटील, अश्विनी मादगुडे, शीला घोडके, अनिल चाचर, डॉ. प्रकाश टेकाळे, महादेव मांदळे, अश्विनी भडके, कल्याणी तावरे, सुरेश मंडलिक, दत्तात्रय भिलारे यांनी काम पाहिले. या प्रशिक्षणासाठी एकूण 250 शिक्षक उपस्थित होते. पहिल्या बॅचच्या समारोप प्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. नामदेव शेंडकर साहेब यांनी उपस्थित राहून सर्व प्रशिक्षणार्थींना मोलाचे मार्गदर्शन व प्रमाणपत्राचे वाटप केले. प्रशिक्षणा दरम्यान सर्व प्रशिक्षणार्थींना दोन वेळेचा चहा व दुपारचे सुग्रास भोजन श्री गणेश केटरर्सचे प्रशांत कडू यांनी उपलब्ध करून दिले. विद्या प्रतिष्ठान प्रशालेतील सर्व कर्मचारी व प्राचार्य अश्विनी मादगुडे यांनी उत्तम सहकार्य केले.

 

हे प्रशिक्षण एकूण चार टप्प्यात देण्यात येणार असून दुसरा टप्पा 17 ते 22 फेब्रुवारी, तिसरा टप्पा 24 फेब्रुवारी ते 1 मार्च, चौथा टप्पा 3 मार्च ते 7 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले असून भोर तालुक्यातील पहिली ते बारावी इयत्तांना शिकवणारे सर्व शिक्षक या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!