शनैश्वर देवस्थानच्या नंदगिरी महाराजांची विनयभंगाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता
संपादक दिलीप वाघमारे
सातारा दिनांक 14 सोळशी, ता. कोरेगांव, जि. सातारा येथील सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती प पु नंदगिरी महाराज यांच्यावर सोळशी येथील महिलेने केलेल्या विनयभंगाच्या खटल्यातून नंदगिरी महाराजांची कोरेगांव न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दिनांक १७/९/२०१९ रोजी सोळशी येथील पिडित महिला तिच्या दोन मुलांची नंदगिरी महाराजांच्या मुलीसोबत भांडणेझालेने सदरची भांडणे आपासांत मिटवून घेवू असे सांगण्यासाठी नंदगिरी महाराजांकडे गेली असता नंदगिरी महाराजांनी तिचा हात धरून ‘मी भांडणे मिटवून घेणार नाही असे म्हणून पिडित महिलेचा हात धरला व मी सांगेल ते केलेस तर मी भांडणेमिटवून घेईल’, असे म्हणून पिडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केलेअशा आशयाची तकार दिनांक १८/०९/२०१९ रोजी सदर पिडित महिलेने नंदगिरी महाराजांच्या विरूद्ध वाठार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.सदर गुन्हयाचा वाठार पोलीसांनी तपास करून दोषारोपपत्र कोरेगांवन्यायालयात पाठविले होते. कोरेगांव न्यायालयामध्ये सदरील खटल्याची सुनावणीपूर्ण होवून सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. नंदगिरीमहाराजांच्यावतीने ॲड. किशोर खराडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरून कोरेगांवन्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती सी. एस. पाटील यांनी नंदगिरीमहाराजांवर केलेला विनयभंगाचा आरोप खोटा असलेचे सिद्ध झालेने त्यांची निर्दोषमुक्तता केली. या खटल्याचे कामी ॲड. किशोर खराडे यांना ॲड. संतोष कुदळे,ॲड. सुदर्शन गावडे, ॲड. अक्षय सरडे यांनी सहाय्य केले. नंदगिरी. महाराजांच्यानिर्दोष मुक्ततेमुळे शनैश्वर भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तरी उद्या प पु नंदगिरी महाराज यांच्या सत्कार आपले सर्व शनी भक्त यांच्या हस्ते करण्यांत येणार आहे.


