पेंजळवाडी गावातील धनश्री चव्हाण हिची पोलीस पदी यशाला गवसणी.


मंगेश पवार

दि.14 सारोळे -:पेंजळवाडी ता.भोर येथील धनश्री सचिन चव्हाण हिच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस,तिचा खडतर प्रवास संपला व आनंदाचा प्रवास सुरू झाला तो म्हणजे पोलीस भरती या क्षेत्रात प्रयत्न करत होती खूप मेहनत घेतली.घरच्यांनी खूप तिला सपोर्ट केला, हे सगळं श्रेय तिच्या घरच्यांना देत आहे.

 

अतिशय मेहनतीने आणि जिद्दीच्या जोरावर धनश्री ने हे यश मिळवले. शिवचैतन्य अकॅडमी शाखा हडपसर या ठिकाणी गेली 2 वर्ष ती प्रशिक्षण घेत होती, तिला शिव चैतन्य अकॅडमी चे मार्गदर्शक शुभम मराठे पुणे शहर पोलिस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच ग्राउंड प्रशिक्षक प्रविण चौगले यांचेही मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर शिवचैतन्य अकॅडमी शाखा हडपसर व सासवड मधून 2024 – 25 या वर्षात 85 हुन अधिक विद्यार्थी पोलीस दलामध्ये भरती झालेत.

ADVERTISEMENT

 

मुलीने पोलिस व्हावे ही माझ्या आई-वडिलांची इच्छा होती. स्वतःचे दोन वर्षाचे लहान मुल सोडून पोलीस भरतीची तयारी करू लागली. चार वर्ष तयारी करत असताना लोक नाव ठेवत होती तरी पण नवऱ्याची आणि सासू सासर्‍याच्या पाठिंब्याने यश खेचून आणले. महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिवचैतन्य ॲकॅडमीमधील शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले. पोलिस व्हायचेच ही जिद्द ठेवली आणि पोलिस बनण्याचे स्वप्न पूर्ण केले’,

धनश्री सचिन चव्हाण मुंबई पोलीस


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!