डॉक्टर डे च्या निमित्ताने निरा व्हॅली मेडिकल असोसिएशन तर्फे सारोळे येथील डॉ. ज्ञानेश्वर महाडिक यांना “धन्वंतरी जीवन गौरव “पुरस्कार मिळाला.
सारोळे : १ जुलै डाॅक्टर्स दिनाच्या पार्श्वभूमीवर निरा व्हॅली मेडिकल असोसिएशन च्या वतिने घेतलेल्या कार्यक्रमामधे सारोऴा ता.भोर जि.पुणे येथील जेष्ठ व प्रख्यात धन्वंतरी डाॅ. ज्ञानेश्वर महाडीक यांचा भोरचे प्रख्यात वैद्यकीय व्यावसायीक डाॅ.सुरेश गोरेगावकर सर यांच्या हस्ते “धन्वंतरी जिवन गाैरव पुरस्कार” देवून सन्मान करण्यात आला.
याच कार्यक्रमामधे निरा व्हॅली मेडिकल असोसिएशन च्या नवकार्यकारिणीचाही पदग्रहन समारंभ पार पडला , डाॅ.पांडुरंग भरगुडे यांनी अध्यक्षपदाची तसेच डाॅ.संतोश तळेकर यांनी उपाध्यक्षपदाची सुत्रे हातात घेतली.
डाॅक्टर्स डे निमित्त रोटरी क्लब शिरवळ खंडाळा यांचे वतिने सर्व डाॅक्टरांचा स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी डाॅ.सुरेश गोरेगावकर सर,डाॅ.विनय जोगळेकर सर,मा.ईश्वरभाई जोशी ,रोटरी क्लबचे नुतन अध्यक्ष राहुल तांबे व सर्व सदस्य हजर होते.
सर्व कार्यक्रमाचे नियोजन निरा व्हॅली मेडिकल असोसिएशन व डाॅ.नरेंद्र वैश्नव यांचे अॅडव्हान्स आॅर्थोपेडीक हाॅस्पिटल यांचे वतिने करण्यात आले.


