प्रहार जनशक्ती पक्षाचा एल्गार – रास्तारोको आंदोलन!”लढा हक्काचा, लढा न्यायाचा!”
संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
पुणे (प्रतिनिधी) – मा. बच्चूभाऊ कडू यांच्या सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला ठाम पाठिंबा देत प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती संघटना – पुणे जिल्हा यांच्या वतीने पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर रास्तारोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ही जनआंदोलनाची मोहीम १४ जून २०२५, सकाळी ९:०० वाजता, शिवाजीनगर एस.टी. स्टँड, वाकडेवाडी, पुणे येथे पार पडणार आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून अन्यायाविरुद्ध आणि हक्काच्या न्यायासाठी एकजुटीने झंझावाती लढा उभारण्यात येणार आहे.
मा. बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार, सर्व प्रहार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या आंदोलनासाठी अजय कांबळे, उपाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष भोर व
बापू कुडले, अध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती संघटना तसेच भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार अपंग क्रांती संघटना, भोर यांच्या वतीने ठाम पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.


