भोर तालुक्यात परिवहन सेवेसाठी गती; उपजिल्हाप्रमुख गणेश निगडे यांची परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत चर्चा


मंगेश पवार

सारोळे :- भोर तालुक्यातील खेड्या-पाड्यांमध्ये एस.टी. परिवहन सेवा अखंड, सुरळीत आणि अधिक मजबूत व्हावी तसेच नव्या बसगाड्या उपलब्ध करून द्याव्यात, या महत्त्वाच्या मागण्यांसाठी शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख गणेश शरदराव निगडे यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय नामदार प्रतापजी सरनाईक यांची दि. 26 रोजी भेट घेतली.

 

या चर्चात्मक भेटीत पुर्व भागातील भोंगवली येथे सब-डेपो सुरू करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी ठोस मागणी करण्यात आली. मंत्री सरनाईक यांनी सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

ADVERTISEMENT

 

भोर तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागासाठी ही पावले महत्त्वाची ठरणार असून, लवकरच परिवहन सेवेत मोठे बदल दिसून येतील आणि नव्या विकास पर्वाची सुरूवात होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

 

भेटीदरम्यान उपजिल्हाप्रमुख गणेशराव निगडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून तालुक्याच्या विकासासाठी घेतलेली पुढाकार सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!