मुलांनी लहान वयात मोबाईल फोन पासून दुर रहावे. – अश्विनी पाटील. सहाय्यक पोलीस निरीक्षक
पुण्यभूमी सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी
बाल्यावस्थेत लहान मुलांची योग्य वाढ व शक्तिशाली होण्यासाठी मुलांना पालकांनी मोबाईल हाताळण्यास देवू नये त्यामुळे बालकाचा मानसिक व शारीरिक वाढ कुंठित होत आहे असे प्रतिपादन मेढा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील यांनी केले.
मेरी एंजल्स हायस्कूल आखाडे , इंग्लिश मिडीयम विद्यालयातील मुला-मुलींसाठी ,मेढा पोलीस प्रशासन मार्फत संपूर्ण मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.ए. पी.आय. अश्विनी पाटील, ए.एस् आय. शिंगटे सर, पो कॉन्स्टेबल श्री वाघमळे , महिला दक्षता समिती अध्यक्षा सौ.जयश्रीताई माजगावकर यांनी सहभाग घेतला..सर्व शालेय शिक्षक, कर्मचारीवर्ग उपस्थित होते..आपल्या मार्गदर्शन करताना पुढे सौ.पाटील म्हणाल्या, मुलांनी चांगल्या सवयी स्वताला लहान वयात लावुन घ्याव्यात मोबाईल फोनमधून होणारे भयानक प्रकार लहान वयात कळत नाहीत. मुलींनी विविध अॅप व व्हाट्सअप ईक्स्ट्रग्राम , फेसबुक वर उत्तर देत बसतात तर फसवणूक होवू शकते .आपल्याबरोबर होणाऱ्या वाईट अनुभव, घटना आई वडील व शिक्षक यांना तात्काळ सांगाव्यात .कसलाच न्यूनगंड बाळगु नये.काही अडचण आल्यास पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती द्यावी. श्री शिंगटे सर आपल्या मनोगतात म्हणाले की, शाळेत सुचना पेटी, सी,सी टी व्ही अद्ययावत करावीत. महिला सहाय्यक यांनी मुलींची विशेष काळजी घ्यावी .सखी सावित्री कमिटी करावी. मासिक अहवाल ठेवावा. सामाजिक कार्यकर्त्या
सौ.जयश्रीताई माजगावकर यांनी मुलांना हसतखेळत व गाणी ,गोष्टीं, व विविध उदाहरण देऊन मार्गदर्शन केले मुलींनी स्वतःला खंबीर करावे, धाडसाने वागावे.आईवडील व शिक्षक त्यांचे पहिले पोलीस आहेत..आपला चांगला वाईट अनुभव, प्रसंग त्यांना सांगावा..या वयात फक्त अभ्यास करून प्रगती करावी..खोटे फोन करु नये ,मुलांनी सर्व मुलींना बहिणीसारखे समजावे.जो पुरुष स्रीयांचा आदर करतो, त्याला सन्मान मिळतो.तुम्हीच या देशातील पुढील नागरिक आहात चारित्र्य संपन्न रहा. साने गुरुजी यांची 125 वी जयंतीनिमित्त त्यांच्या विविध पैलूंवरील गोष्टींवर चर्चा केली.संस्कार सांगणारे शामची आई पुस्तक समजून घ्या. आता विभक्त कुटुंब आहेत, आजी आजोबा मुलांबरोबर नसतात.त्यामुळेच आज मुले असुरक्षित आहेत असं वाटतंय.काळजी घ्या असे आवाहन केले.या उपक्रमाबद्दल मेढा पोलीस प्रमुख श्री पृथ्वीराज ताटे यांनी समाधान व्यक्त केले. शेवटी मुख्याध्यापकांनी आभार मानले .

			
