भोरच्या रॉयल कराटे अकॅडमीचा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत डंका – 12 सुवर्ण, 7 रौप्य आणि 1 कास्य पदकांची कमाई


मुंबई:-  दि. 14 सप्टेंबर 2025 रोजी चेंबूर येथे सुप्रीम मार्शल आर्ट कराटे फेडरेशन तर्फे तिसरी राष्ट्रीय खुली कराटे अजिंक्यपद स्पर्धा झाली. या स्पर्धेत दिल्ली, कोलकाता, राजस्थान, भोपाळ, भोर (पुणे), पालघर आणि मुंबई येथील शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला.

 

या चॅम्पियनशिपमध्ये भोर तालुक्यातील रॉयल कराटे स्पोर्ट्स मार्शल आर्ट अकॅडमी महाराष्ट्र भोर येथील दहा विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून भोर तालुक्याचा गौरव वाढवला.

 

आकांक्षा पांडुरंग दामगुडे – डबल सुवर्ण

अभिमन्यू धैर्यशील जेधे – डबल सुवर्ण

गायत्री प्रसाद बोडके – सुवर्ण आणि रौप्य

यश आनंदा पिलाणे – सुवर्ण आणि रौप्य

ओजेस्विता युवराज देशमुख – सुवर्ण आणि रौप्य

ADVERTISEMENT

आयुष्य युवराज देशमुख – सुवर्ण आणि रौप्य

आदिती पिंटू भोसले – सुवर्ण आणि रौप्य

अथर्व पिंटू भोसले – सुवर्ण आणि रौप्य

शिवम प्रतिक जगताप – सुवर्ण आणि रौप्य

आकांक्षा अर्जुन चौधरी – सुवर्ण आणि कास्य

 

या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून एकूण 12 सुवर्ण, 7 रौप्य आणि 1 कास्य पदकांची कमाई केली.

 

विद्यार्थ्यांच्या यशामागे शिहान दिनेश सुरेश धुमाळ, सेन्सेई मीना दिनेश धुमाळ, ग्रँड मास्टर आप्पा चिकणे आणि शिहान शान महम्मद यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. इरफान खान आणि डॉ. इमरान खान यांचे विशेष सहकार्य मिळाले.

 

या चमकदार विजयामुळे भोर तालुक्यात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!