श्री तुळजा भवानी मंदिर, बाळूपाटलाचीवाडी येथे श्री व सौ. मिसाळ महाराजांच्या परिवारातर्फे नवरात्रोत्सवाचे उत्साहात आयोजन.
संपादक दिलीप वाघमारे
क्षेत्र पाडेगाव टेकडी, बाळुपाटलाचीवाडी ता. खंडाळा, जि.सातारा . निरा- लोणंद महामार्गावर असणारे व परमपूज्य कै. दामू नामदेव मिसाळ महाराज यांच्या अथांग भक्तीने व अथक परिश्रमाने पावन झालेल्या नंदनवनातून श्री तुळजाभवानी मंदिर येथे तीर्थक्षेत्राची स्थापना करणारे महाराजांनी सन १९९० सालापासून गेली ३६ वर्षापासून सुरू केलेला शारदीय नवरात्रोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात महाराजांचा परिवार व मंदिराचे व्यवस्थापक श्री व सौ. शितल, संभाजी दामू मिसाळ यांनी केलेले आहे.
शारदीय नवरात्र काळात सालाबाद प्रमाणे दररोज श्रींची महापूजा, आरती, भजन व इतर कार्यक्रम व मंदिराची नयनरम्य सजावट महाराजांच्या परिवाराकडून भक्तिमय वातावरणात करण्यात आली आहे, मंदिर परिसरात प्रसन्न सात्विक व भक्तिमय वातावरण असल्याने व्यवस्थापक महाराजांच्या परिवाराचे भाविकांकडून कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे या तीर्थक्षेत्राचे व्यवस्थापन येथील साजरे होणारे सर्व सण उत्सव याचा खर्च महाराजांचा परिवार ग्रामस्थांकडून व इतर भाविकांकडून कोणत्याही प्रकारची देणगी वर्गणी न घेता श्री व सौ शितल, संभाजी मिसाळ महाराजांचे कुटुंबीय केवळ वडिलांनी आयुष्यभर अत्यंत कष्टातून व निस्वार्थ भावनेतून निर्मान केलेल्या नंदनवनातून सात्विक व आध्यात्मिक तीर्थक्षेत्राचा वारसा चालवण्यासाठी आनंदी भावनेने स्वखर्चातून करीत असतो
गेली ३६ वर्षापासून तीर्थक्षेत्राची स्थापना करणारे परमपूज्य कै. दामू नामदेव मिसाळ यांच्या भक्तीचा वारसा निस्वार्थपणे जपणारे मंदिराचे व्यवस्थापक श्री व सौ शितल, संभाजी मिसाळ मंदिराच्या शेजारी हॉटेल व्यवसाय करून या मंदिराची देखभाल व कुटुंब उत्तम प्रकारे चालवतात. दोघेही सुशिक्षित असून आपली आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील निस्वार्थपणे धार्मिक व सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असतात. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना पंचक्रोशीतून तसेच विविध सामाजिक संस्थांकडून अनेक सन्मान, व पुरस्कार मिळालेले आहेत.


