भोर तालुक्यातील हरिश्चंद्री येथे महाविकास आघाडीचा भव्यदिव्य शेतकरी मेळावा.


कापूरहोळ : पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

महाविकास आघाडीची आज पुणे सातारा महामार्ग लगत भोर तालुक्यातील हरिश्चंद्री येथे सभा पार पडली. या सभेत त्यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली.
काँग्रेसने गेल्या 70 वर्षात या देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास केला. पण यांना वाटतं हा देश 2014 मध्ये निर्माण झाला. त्या आधी हा देशच नव्हता, शरद पवार नव्हते, यशवंतराव चव्हाण नव्हते, बाळासाहेब ठाकरे नव्हते. लाल किल्ला सुद्धा मोदींनी बांधला. रिझर्व बँक मोदींनी बांधली मग त्या बँकेतले पैसे पळवायला अमित शहा यांना आणलं.  एक नंबरचे ढोंगी आणि खोटारडे आहेत असा घनाघात संजय राऊत यांनी केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.

 

 

तरुणांना बेरोजगारीच्या माध्यमातून MIDC चा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करायचा. निवडणूक आली की तालुक्यात MIDC झाली पाहिजे. आणि निवडणूक संपली की यानिमित्ताने त्याच्यावर ब्र शब्द काढायचा नाही अशा पद्धतीचं घाणेरड राजकारण या मतदारसंघांमध्ये सुरू आहे. भोरच्या MIDC चा प्रश्न१९९२ साली मा. मंत्री अनंतरावजी थोपटे यांनी ऊत्रोली आणि वडगाव च्या जागेवर संपादनाचे शिक्के त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न झाला. तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला आणि असता काय तो विरोध कायम आहे आणि तो विरोध असल्या कारणाने त्या ठिकाणी MIDC होत नाही परंतु दुर्दैवाने त्याचे खापर आमच्या माथ्यावर फोडायचं आणि निवडणूक आली की आपली पोळी भाजायची हा कार्यक्रम साहेब या मंडळीचा आहे. येणारा काळ निश्चितपणे या तरुणांना रोजगाराच्या निमित्ताने चांगली दिशा देणार या निमित्ताने यावा या तालुक्याच्या प्रत्येक तरुणाला रोजगार मिळावा अशी आमच्या सर्वांची देखील मनापासून इच्छा आहे. असे संग्राम थोपटे बोलले.

ADVERTISEMENT

कुणासाठी सर्व चाललंय हे पक्षफोड,घरफोड काय? याचा अर्थ त्यांची ताकदच नाहीये भारतीय जनता पक्षाची आणि दहा वर्षे आम्हाला विचारतात ७० वर्ष मे तुमने क्या किया अहो माझ्याकडे उत्तर आहे.७० वर्षात आम्ही काय केले ते,
वीज कोणी आणली, कॉलेज कोणी काढलं, अंगणवाडी, शाळा, हॉस्पिटल, औषध, बँक दुधाचा व्यवसाय कोणी काढला तो काँग्रेसने केला. हे सर्व काँग्रेसच्या काळातला आहे मग १० वर्षात काय पाडलं आपल्या पदरात? तर महागाई आणि बेरोजगारी? मी तुम्हाला शब्द देते उद्धवजी, पवारसाहेब, आणि राऊत यांच्याशी चर्चा करून सांगते की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि जेव्हा काँग्रेसचे राज्य येईल तेव्हा राज्यामध्ये सगळ्यात मोठे सरसकट कर्जमाफी कोण करेल? तर ते आमचे सरकार करेल. दहा लाख कोटी माफ केले भाजप सरकारने, हे तुमचे नाही केले उद्योगपतींचे केले. उद्योजकांचे कर्ज माफ करायला दहा लाख कोटी आहेत पण आपल्यासाठी एक लाख कोटी नाहीयेत. असा घनाघात सुप्रिया सुळे यांनी केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!