राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात जनसुनावणी – भोरमधून महिलांना उपस्थित राहण्याचे प्रहार जनशक्तीचे आवाहन.
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
दि. 1 जुलै पुणे – पीडित महिलांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक २ जुलै २०२५ रोजी महिला जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण सुनावणीस राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. विजया राहाटकर स्वतः अध्यक्षता करणार आहेत.
या जनसुनावणीचे आयोजन विशेषतः त्या महिलांसाठी करण्यात आले आहे, ज्या कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, शारीरिक अथवा मानसिक छळ, लैंगिक शोषण किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अन्यायाला सामोऱ्या गेल्या आहेत. महिलांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्ष, भोर तालुका यांच्यावतीने भोर व परिसरातील सर्व पीडित महिलांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी ही संधी गांभीर्याने घेऊन या सुनावणीत आवर्जून उपस्थित राहावे.
सामाजिक कार्यकर्ता अजय कांबळे यांनी सांगितले की, “हा कार्यक्रम महिलांसाठी न्याय मिळवून देणारी एक प्रभावी संधी आहे. भोर तालुक्यातील जेवढ्या महिलांनी अन्याय सहन केला आहे, त्यांनी या सुनावणीत भाग घेऊन स्वतःचा आवाज उठवावा. तुमच्या उपस्थितीतूनच न्यायप्रक्रियेला बळ मिळेल.”
सुनावणीचे तपशील:
ठिकाण: जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे ,बुधवार, २ जुलै २०२५
वेळ: दुपारी २ वाजता
संपर्क: अजय कांबळे – 9921601145
या सुनावणीच्या माध्यमातून पीडित महिलांना थेट प्रशासन व आयोगासमोर आपली व्यथा मांडण्याची संधी मिळणार आहे. यामुळे प्रलंबित तक्रारींवर त्वरित निर्णय होण्याची शक्यता आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या सक्षमीकरणाला मोठे बळ मिळणार असून, अशा प्रकारच्या सुनावण्या न्यायदान प्रक्रियेत मोठा टप्पा ठरतील, प्रहार जनशक्ती पक्ष उपाध्यक्ष अजय कांबळे


