अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी धावून आले पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई !मा. ना. शंभूराज देसाईच्या संवेदनशीलतेचे दर्शन.


 

सातारा प्रतिनिधी  : शंकर माने

श्री. आनंदराव जगन्नाथ पाटील (वय ५९) हे शिरवडे (ता. कराड) येथील ग्रामस्थ असून ते आज उरुल घाट रस्त्यावर दुचाकीवरून जाताना त्यांच्या अपघात झाला. यावेळी त्यांना मार लागल्याने रक्तस्राव होऊ लागला.

 

 

नेमके यादरम्यान पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांचा ताफा साताऱ्याहून पाटणकडे येत होता. श्री. आनंदराव पाटील यांना रस्त्याच्या कडेला असहाय अवस्थेत पाहून मा. ना. शंभूराज देसाईनी तातडीने ताफा थांबण्यास सांगितले. ते स्वतः गाडीतून खाली उतरले आणि श्री. पाटील यांच्यापाशी गेले. थोडक्यात विचारपुस करून मा. ना. शंभूराज देसाई यांनी आपल्या ताफ्यातील गाडीतून श्री. पाटील यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्याच्या सूचना दिल्या. तसेच ताफ्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनाही सोबत जाण्यास सांगून तातडीने उपचार मिळतील, याची खबरदारी घेण्यास सांगितले. त्यानुसार श्री. पाटील यांना मल्हारपेठ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

अवघ्या मिनिटभरात घडलेला हा प्रसंग. पण मा. ना. शंभूराज देसाईच्या समयसूचकता आणि संवेदनशीलतेमुळे अपघातग्रस्त नागरिकाला तातडीने उपचार मिळू शकले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!