महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी राजगड (वेल्हा)तालुक्यातील पानशेत धरण भागात गावभेट दौरा.


भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी राजगड (वेल्हा)तालुक्यातील पानशेत धरण भागातील कुरण, वरसगाव- गोरडवाडी, साईव- पडाळघरवाडी, मोसे, पानशेत, रुळे, ओसाडे, निगडे मोसे, आंबेड, खामगांव रांजणे, कोंडगाव या गावातील मतदार बंधू-भगिनीं यांच्या सोबत गाव भेट दौरा निमित्त भेट घेऊन सवांद साधला.

यावेळी बोलताना ते म्हणाले पानशेत धरण भागातील मुख्य असलेला पानशेत ते घोलपघर रस्ता, घोलपघर ते कोशिंमघर – भालवडी रस्ता, कादवे-वडघर रस्ता, कादवे येथील साकव, कम्युनिटी हॉल ही कामे झाली त्याचबरोबर आगामी काळात मुळशीला जोडणारा रस्ता मार्गी लावण्याचा आपला उद्देश आहे. याठिकाणी अनेकांनी प्रलोभने दाखवली पण या भागातील जनता साहेबांपासून सदैव आपल्या सोबत आहे याचा अभिमान वाटतो.!

ADVERTISEMENT

त्याचबरोबर वरसगाव-गोरडवाडी हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून असलेले गाव आहे. डोंगरी भाग असल्यानं या गावात विजेचा प्रश्न होता त्यावर उपाय म्हणून सोलर पॅनलच्या माध्यमातून मुबलक पाणी पुरविण्याचं काम आपल्या करता आले, पुनर्वसन गावठाणच्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे तसेच पुनर्वसन मध्ये जी जमीन गेली आहे ती पुन्हा शेतकऱ्यांना मिळावी या दोन्ही प्रश्नांच्याबद्दल आपण प्रयत्नशील आहोत. राष्ट्रहितासाठी जश्या जवानांच्या प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी दिल्या गेल्या त्याप्रमाणेच राष्ट्रहितासाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी बांधण्यात आलेल्या धरणामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना हक्काच्या जमिनी कश्या मिळतील त्यासाठी देखील आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

 

यावेळी शंकर आण्णा ठाकर, माऊली शिंदे, नानासो राऊत, दिनकरराव धरपाळे, अमोल नलावडे, दिनकरआण्णा सरपाले, सीमाताई राऊत, विकास अण्णा पासलकर, दुर्गाताई चोरगे, छायाताई काळे, अमोल पडवळ, प्रमोद लोहकरे, शिवराज शेंडकर, गणेश जागडे, आकाश वाडघरे, महाराज कोकाटे, लक्ष्मणराव तावरे, भगवानराव बांदल, लहू अण्णा निवंगुणे, गोपाळ दसवडकर, अनंता शेंडकर, संभाजी खुटवड यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ महिला भगिनी व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!