खळबळजनक! पुण्यात निवडणूक अधिकाऱ्याची कारच पेटवली,
दि. 5 पुणे प्रतिनिधी : पुण्यातील चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याची चारचाकी वाहन एका दिव्यांग व्यक्तीने आग लावून पेटवून दिली आहे. सोपान ओव्हाळ असं या व्यक्तीचं नाव आहे. दिव्यांग सोपान ओव्हाळ यांनी 15 ऑगस्टला महापालिका आयुक्त शेखर सिंग यांच वाहन देखील फोडण्याचा प्रयत्न केला होता.
दिव्यांग सोपान ओव्हाळ यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाकडे रसवंती गुर्हाळ आणि रमाई आवास योजनेच घरकुल मिळाले नाही त्या नैराश्यामधून कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सोपान ओव्हाळ यांनी असं का केलं असेल? अशी चर्चा आता रंगत आहेत. अर्थात त्यामागचं कारण देखील समोर आली आहे. या प्रकरणी आता प्रशासन आणि पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
थेरगाव येथील पिपरी चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयाच्या ठिकाणी सध्या चिंचवड विधानसभा निवडणुकीचे काम सुरू आहे. याच ठिकाणी चिंचवड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय देखील आहे. त्याच कार्यालयात एका दिव्यांग व्यक्तीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एका चारचाकी वाहनाला आग लावून पेटवून दिलं आहे. सुदैवाने यात पिंपरी चिंचवड महापालिकेचे कोणतेही कर्मचारी जखमी झाले नाहीत. वाहन पेटवून देणाऱ्या दिव्यांग व्यक्तीला आणि सोबत असलेल्या दोन व्यक्तींना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

 
			

 
					 
							 
							