रुपाली चाकणकरांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकरांच्या प्रचाराचा नारळ फुटणार.
पुण्यभूमी न्यूज नेटवर्क.
मुळशी : भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडकेर यांच्या प्रचाराचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
मंगळवारी (दि. ५ रोजी) सकाळी ९ वाजता मुळशी तालुक्यातील बेलावडे येथील धावरे बाबा महाराज संजीवन समाधी मंदिरामध्ये शंकर मांडेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ होईल.
ADVERTISEMENT
यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत. या प्रचार सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (ए), तसेच महायुतीमधील इतर पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


