पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्वीकारला पदभार, सातारा जिल्हाधिकारी म्हणून उत्कृंष्ट कार्यकाल ठरला, मावळते जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेंना पदोन्नती,
उपसंपादक :संभाजी पुरीगोसावी
पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी येण्यास पदभार स्वीकारला, यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी त्यांचे स्वागत करीत त्यांच्याकडे पदभार सोपवला, डॉ. सुहास दिवसे यांची जमाबंदी आयुक्तपदी पदोन्नती करण्यात आली आहे, जितेंद्र डूडी यापूर्वी सन 2011 मध्ये जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा नंदुरबार, सन 2019 ते 2020 या कालावधीत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प घोडेगांव पुणे तर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सातारा जिल्हाधिकारी या पदावर काम केले आहे, साताऱ्यात जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक पार पडली या दोन्ही निवडणुका शांततेत पार पडल्या सुमारे दीड वर्षाचा कार्यकाल यांना सातारा येथे मिळाला त्यांनी स्मार्ट स्कूल स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र सह विविध विषयावर उल्लेखनीय काम केले आहे, पुणे जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या पत्नी देखील आयपीएस अधिकारी आहेत.