सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रथम, पुरीगोसावी यांच्याकडून स्वागत,
संतोष पाटील सातारचे नवे जिल्हाधिकारी, संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी. राज्य शासनांने राज्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सूत्र सुरूच ठेवले असून गुरुवारी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारी पदी बदली केली आहे, तर सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे, राज्यांत महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे, सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचीही बदली करण्यात आली असून. पुणे जिल्हाधिकारी पदाचा पदभार जितेंद्र डूडी घेणार आहेत, सातारा जिल्हाधिकारी पदी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे, संतोष पाटील हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील उंडेगांव ता. बार्शी येथील रहिवासी आहेत,1996 मध्ये ते राज्य प्रशासकीय सेवेत रुजू झाले होते आत्तापर्यंत यांनी राज्यांत विविध ठिकाणी काम केले आहे, सातारचे मावळते जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक पार पडली. या दोन्ही निवडणुका शांततेत पार पडल्या, जितेंद्र डुडी यांना सुमारे दीड वर्षाचा कार्यकाल हा सातारा येथे मिळाला, स्मार्ट स्कूल,स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र यासह विविध विषयावर उल्लेखनीय काम केले आहे, तर पुण्याचे विद्यमान जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना बढती देण्यात आली असून राज्याचे सेटलमेंट कमिशनर आणि भूमी अभिलेख संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, सातारचे विद्यमान नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे संभाजी पुरीगोसावी यांनी स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या,