भोर शिवसेनेच्या युवा सेनेचा मेळावा शिवनेरी कार्यालयात संपन्न; विधानसभेत भोर, राजगड, मुळशीत भगवा फडकवणार.
दि. १८ नसरापूर : भोर तालुक्यातील वर्वे येथील शिवनेरी मंगल कार्यालयात शिवसेनेचा युवा सेना मेळावा शुक्रवार दि. १८ रोजी घेण्यात आला. या मेळाव्याला मा. मंत्री विजय शिवतारे,युवा सेना अध्यक्ष पूर्वेश सरनाईक,उपस्थित होते. यावेळी कुलदीप कोंडे यांनी बोलताना सांगितले की,महाराष्ट्र मध्ये लाडक्या बहिणीच्या तोंडावर ज्यांचं नाव आहे ते भगवी तोफ,मुलुख मैदानी तोफ यांचा जे नाव आहे ते महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव आहे.अनेक कल्याणकारी योजना राज्यातील महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी,गिरणी कामगारांसाठी अशा प्रत्येक घटकांसाठी त्यांनी योजना आणल्या आहेत.
येथून पुढे 35 दिवसांमध्ये मतदार संघातील लोकांकडे पोहोचले पाहिजे. लोक मतदान करायला इच्छुक आहेत त्यांच्यापर्यंत ज्या सरकारने योजना आणल्यात आहेत त्याची पोचपावती घेऊन पोहोचले पाहिजे.म्हूणन शिवसेनेचा कणा आहे तो युवासेना आहे, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली तर निवडणूक महाराष्ट्र जिंकायला काही अवघड जाणार नाही.युवासेना कार्यकर्त्यांनी प्रचाराचे धुरा हातामध्ये घेतली तर निश्चितच ही निवडणूक जिंकली जाईल. भोर राजगड मुळशी मध्ये उमेदवार कुठला असेल हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. उमेदवारी नाकारली तर नाराज न होता समजून जायचं की कदाचित आपण सर्वेमध्ये किंवा त्या निवडून येणे मध्ये कमी पडलो असेल तर निवडून येणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी मिळणार आहे आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणायसाठी आपण थोड्यावरती आलो आहे. गेल्या वेळी आपल्याला 100000 मते धनुष्यबाणाला मिळाली. धनुष्यबाणापेक्षा समोरच्या उमेदवाराला 108000 मते त्यावेळी होती. म्हणजे त्यावेळी 4500 हजार मतांची गरज होती. आज आपली परिस्थिती चांगली आहे, समोरच्या उमेदवाराची परिस्थिती चांगली नाही.
पाच-सहा दिवसापूर्वी पेपरच्या फेक बातम्या तयार करून पसरवल्या होत्या. त्यावेळी भोर तालुक्यातील पत्रकारांनी मीटिंग घेण्याची वेळ आली होती. पत्रकारांची सुद्धा गरज भासते की नाही, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. असे यावेळी कुलदीप कोंडे यांनी सांगितले.
यावेळी मेळाव्याला अमोल पांगारे माजी पंचायत समिती सदस्य, दशरथ जाधव तालुका उपाध्यक्ष, निलेश घारे युवा सेना जिल्हाप्रमुख, सोमनाथ कुटे युवा सेना उपजिल्हाप्रमुख, दीपक करंजावणे मुळशी तालुकाप्रमुख, स्वप्निल सातपुते मुळशी युवा तालुकाप्रमुख, रेणुका रोकडे युवती सेना तालुकाप्रमुख मुळशी, किरण साळी सचिव युवा सेना, नितीन सोनवणे शहर प्रमुख भोर, गणेश निगडे उपजिल्हाप्रमुख, विकास बापू चव्हाण माजी सरपंच पेंजळवाडी, स्वप्निल गाडे तालुकाप्रमुख भोर, अमित गाडे, किशोर बारणे, हर्षद बोबडे सर आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज जगताप यांनी केले.
उद्याच भविष्य काय असल धनुष्यबान,महायुती बोलत असतील पण मनापासून माझी इच्छा आहे की कुलदीप कोंडे आमदार झाला पाहिजे. दहा वर्षे झाली डोंगर दऱ्यांमध्ये कुलदीप कोंडे अहोरात्र काम करीत आहे.
योग्य संधी मिळाली तर या सर्व भागातील जनतेचा कल्याण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्यक्ती म्हणून इतिहासात नोंद होईल अशा प्रकारचा हा माणूस आहे. विजय शिवतारे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य
मी त्यांना आज आश्वासन देतो, येणाऱ्या विधानसभेमध्ये विजय शिवतारे किरण आणि मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिफारस करणार आहे की या मतदारसंघांमध्ये एका चांगले चेहऱ्याला आणि तमाम प्रेम करणारे कार्यकर्त्यांवरती प्रेम करणाऱ्याला संधी द्यावी असा प्रयत्न करणार आहे.
पूर्वेश सरनाईक युवासेना कार्याध्यक्ष