त्यांना मृगजळाचा भास होतोय पाणी गावा शेजारी असताना काय करायचं आहे बोंडारवाडी धरण..! ” वाचा विचार करा – शांताराम कदम ( गौदेमाळ )


 

सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी

 

बोंडारवाडी धरण होणार म्हणजे होणार हा निर्धार बोंडारवाडी धरण कृती समिती व श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डाॅ.भारत पाटणकर यांचा पण आहे

जावली तालूक्याच्या एका टोकाला कण्हेर धरण आहे हे बांधल गेले त्या वेळी वेण्णानदीच्या तिरावर आसलेलेल्या गावांच पूर्नवसन झाल काही गाव थोडी डोंगर साईटला सरून तिथेच राहिली

जमिनी मिळाल्या काहीना मिळाल्या नाहीत आज जे लोक वेण्णातीरावर राहिली आहेत त्यांना मृगजळाचा भास होतोय पाणी गावा शेजारी असताना काय करायच आहे बोंडारवाडी धरण ह्या ब्रह्मापोटी मेढ्याच्या खालील गावानी बोंडारवाडी धरण लढ्यातून पाठ फिरवली आहे फार आनंदाची गोष्ट आहे पण विचार करा मूळात कण्हेर धरण हे तुमच्या साठी नाहीच म्हणून बाबानो तुमची मूलबाळ सगळी मूंबईला रोजगारा साठी धावतायत पण मूंबईला राबणारा घाम गाळणारा नोकरी करणारा मूंबईकर सुद्धा आपल्या घरी निरोप पाठवत नाही की बोंडारवाडी धरण कृती समितीला पाठबळ दया.

हातात पैसा ताजा मिळतोय पण भविष्य कुणी पाहिलय ह्या आपल्या ब्रह्मपोटी

बोंडारवाडी धरणाच्या लढ्यातून ऐक एक माघार घेऊन आपल्या पायावर दगड मारून घेत आहे का कूणास ठाऊक पण विचार करण्याची लोकांची मानसिक्ता राहिली नाही

ADVERTISEMENT

आरे बाबानो वेळ गेली नाही विचार करा

जे देश भक्त झाले त्यांनी कधी स्वःताचा विचार नाही केला मरणाला हसत हसत मिठ्ठी मारत होते

तूमचे आमचे विचार का आसे बूरस्टले झाले

वेण्णा नदीवरच्या किती योजना बारमाही चालतात किती पाणी पुरते

विचार करा तुम्हाला जरी वाटत आसंल आम्हाला मेढ्याच्या खाली पाण्याची गरज नाही

पण येणारा काळ तूम्हाला कळून देईल आरे जर लढला असता पाण्यासाठी तर आज ही वेळ आली नसती वण वण पाण्यासाठी फिरण्याची पण बाबानो तूमच्या सुपीक डोक्यात विचारच घूसत नसतील तर कोण काय करणार यदा कदाचित धरण झालच नाही तर जावलीच्या इतिहासात तूमची आपली सर्वांची एक नोंद राहाणार की

जावलीतील लोक संघर्ष करण्याच्या कामाची नाहीत कारण जिवन मरणाच्या प्रश्नावर आपण एकत्र येत नसाल तर ह्या पेक्षा दूसरी शोकांतिका आसूच शकत नाही

वाचा पुन्हा वाचा विचार करा

उटा लढण्याच्या इरादाणे साक्षिदार होऊ सुवर्ण क्षणाचे

माझे कर जूळती वाचणाराच्या चरणावर्ती .

आणि नतमस्तक होतो लढ्यात सामिल होणार्‍याच्या चरणांवरती.

आपला सर्वांचा चरण सेवक

शांताराम कदम ( गोंदेमाळ )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!