वरवे गावच्या हद्दीत ट्रकची कारला धडक! २५००० हजार रुपयांचे केले नुकसान.
मुख्य संपादक: मंगेश पवार
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज.
वरवे गावच्या हद्दीत ट्रकची कारला धडक दिल्यामुळे कारचे २५००० रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि.२१/४/२४ रोजी वरवे ता. भोर जि. पुणे गावच्या हद्दीत पुणे ते सातारा रोडवर युनिव्हर्सल कंपनीच्या समोर प्रमोद कुमार सिंग वय ५३ वर्ष यांनी त्यांच्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्र.MH०४ JU ८१२२ हा भरधाव वेगाने चालवून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून फिर्यादी स्वप्नील रमेश भुजबळ वय 43 वर्ष यांच्या कार क्र. MH १२ EX ८५९२ या गाडीच्या उजव्या बाजूला धडक दिली. त्यामध्ये कारचे २५००० रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे स्वप्निल भुजबळ यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक कांबळे करीत आहेत.


