मोहन दहीकर यांनी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला..! पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल नेहमीच प्रयत्नशील राहिले, अग्रवाल यांची पुण्याला बदली..!
संभाजी पुरीगोसावी ( सिंधुदुर्ग जिल्हा ) प्रतिनिधी. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची पुणे पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागेवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस उपआयुक्त ठाणे शहरांचे मोहन दहीकर रुजू झाले असून त्यांनी शनिवारी मावळते पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडून सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे, पोलीस अधीक्षक सौरभ आग्रवाल यांनी 21 ऑक्टोबर 2022 रोजी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला होता, जिल्ह्यात अग्रवाल हे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच यशस्वी ठरले, मोहन दहीकर हे देखील एक वरिष्ठ अधिकारी त्यांनी देखील विविध जिल्ह्यात आपल्या कामाची आगळीवेगळी छाप पडली आहे, धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या पोलीस अधीक्षकांच्या देखील बदल्या करण्यात आल्या, राज्यांत गुरुवारी पोलीस अधीक्षक आणि पोलीस उप आयुक्त पदांवरील जवळपास 22 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

