राष्ट्रीय आदर्श महिलारत्न पुरस्कार प्राप्त धनगरवाडी गावच्या आदर्श सरपंच यमुनाताई शिवतरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा.


खंडाळा प्रतिनिधी: धर्मेंद्र वर्पे

धनगरवाडी ता.खंडाळा च्या आदर्श महिला सरपंच सौ यमुना अमोल शिवतरे यांचा दि.५/१/२०२५ रोजी अभिष्टचिंतन सोहळा साजरा होत आहे.यमुना शिवतरे या उच्च शिक्षित असून त्यांनी एम.ए.(इकॉनॉमिक्स) पदवीधर आहेत.धनगरवाडी ता. खंडाळा.जि.सातारा येथील त्या आदर्श लोकनियुक्त महिला सरपंच म्हणून काम पाहतात.

नुकताच त्यांना २०२४ मध्ये द रॉयल ग्रुपचा राज्यस्तरीय आदर्श महिला सरपंच पुरस्कार प्राप्त झाला आहे,याबरोबरच ईगल फाउंडेशन या नामांकित संस्थेमार्फत अत्यंत प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पातळीवरचा राष्ट्रीय आदर्श महिलारत्न पुरस्कार २०२४ सुद्धा त्यांना मिळाला आहे.

‌ सामाजिक कामातून राजकारणाकडे वळत असताना त्यांनी काही गोष्टींचा विचार नक्कीच केलेला होता,ज्या क्षेत्रात आपण जात आहोत त्या क्षेत्राचा लोककल्याणासाठी आणि जनसेवेसाठी वापर करायचा असाच ठाम निश्चय त्यांनी केलेला होता,असे जरी असले तरी नेतृत्व ते व्यक्तिमत्व आणि त्यांच्यातील कार्यकर्तृत्वाचे गुण मात्र जशास तसेच आहेत. यमुनाताईंच्या कामाच्या कार्यकक्षा कुठल्याही एका वर्तुळात पुरत्या मर्यादित नाहीत. सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक,धार्मिक,शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांची भरीव कामगिरी आहे.वेळ काळ आणि प्रसंग ओळखून धावून जाण्याची त्यांच्याकडे हातोटी आहे. एरव्ही तर त्या त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला पूर्ण क्षमतेने मदत करतातच मात्र सार्वजनिक संकटाच्या काळातही त्या नेहमीच निरपेक्ष भावनेने समाजसेवेसाठी पुढे असतात.

महिला सरपंच म्हणून तहानलेल्यांना पाणी,भुकेलेल्या अन्न आणि गरजूंवर उपचाराची सोय त्या नेहमीच करतात. एकूणच त्यांची चौफेर पद्धतीचे काम करण्याची पद्धत सर्व ग्रामस्थांना माहित आहे. गावातील प्रत्येकाच्या मदतीला जाण्यास त्या नेहमीच तत्पर असतात.मदतीचा हात पुढे करीत असताना त्यांनी नाव, गाव, जात-पात असा कधीही भेदभाव केला नाही.

ADVERTISEMENT

धनगरवाडी गावामध्ये विकासाचा डोंगर त्यांनी उभा केला,याचं कौतुक संपूर्ण खंडाळा तालुक्यामध्ये अनेक नागरिक करत आहे.गावात चारी बाजूने डांबरीकरण रस्ते,सुरक्षा दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे आजही त्यांच्या सामाजिक विकासाची बाजू दाखवतात. त्या नेहमीच नवीन आव्हाने व त्याचे क्षितिजे करण्याची संधी शोधत असतात. महिला सरपंच म्हणून काम करत असताना आपल्या कामाचा कायमच त्या प्रभाव टाकतात असेच म्हणावे लागेल.मेहनतीच्या जोरावर यशस्वी होण्याचे धाडस त्यांच्यामध्ये आहे.त्यांनी आपली ओळख विकासरत्न म्हणून निर्माण केली.प्रत्येक कार्य, नियोजन पध्दतीने आणि अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारीने त्या पार पाडत असतात.वेळेचे महत्व प्राप्त करून समीकरण जुळविताना असणाऱ्या स्पर्धेमध्ये यश कसे मिळवायचं याचं ज्ञान त्यांनी आत्मसात केले आहे.अपयशाला यशस्वी करून दाखवणाऱ्या,तसेच प्रकाशाचा वेग घेत अविरतपणे गावाचा विकास करत असताना येणाऱ्या अडचणीवर त्या नेहमीच मात करीत असतात.आपल्याला नशिबावर अवलंबून न राहता यशस्वी होऊन दाखवायचे हे स्वप्न बाळगत गावचा विकास त्या करत आहेत आणि यापुढे करणार आहेत.पती अमोल शिवतरे यांच्या मार्गदर्शनाखाली आजही आणि यापुढेही त्या समाजासाठी आपले सामाजिक योगदान देणार आहेत.प्रचंड इच्छाशक्तीवर अथक व जिद्दीने केलेले कुठले कार्य सफल होऊ शकते म्हणून अतिशय नम्र आणि प्रत्येक कामात आत्मविश्वास ठेवून त्यांचं काम चालू असते. माणसाच्या जीवनात अनेकदा चढ-उतार येतात असा त्यांनी कधी विचार न करता आपला प्रवास पाण्यासारखा अविरतपणे सुरू ठेवायचा असतो,त्यासाठी आपले विचार सकारात्मक असले पाहिजेत,हाच विचार डोळ्यासमोर ठेवून एक अष्टपैलू महिला विकासरत्न म्हणून आज त्या लोकांच्या मनावर राज्य करू लागल्या आहेत.

अशा या सर्व गुणसंपन्न आदर्श राष्ट्रीय महिलारत्न पुरस्कार विजेत्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ यमुना अमोल शिवतरे यांना राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक पत्रकारिता च्या माध्यमातून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!