घरफोडी करणाऱ्या पर राज्यांतील टोळीतील 4 आरोपींना मंचर पोलिसांनी ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची दमदार कामगिरी,
उपसंपादक : संभाजी पुरीगोसावि
घोडेगांव मंचर (ता. आंबेगाव) येथील पोलीस ठाणेच्या हद्दीत विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या परराज्यांतील टोळीतील चार आरोपींना मंचर पोलिसांनी अटक केली आहे, त्यांच्या जवळून सुमारे 13 लाख 20 हजार 478 रुपयांचा चारचाकी गाडीसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, घोडेगांव न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती खेड विभागांचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे, मंचर गावच्या हद्दीत एस.कॉर्नर येथील लक्ष्मीपूजन सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी तीन बंद प्लॉट फोडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण 7 लाख 72 हजार 500 रुपयांची घरफोडी केली होती, अशी फिर्याद लक्ष्मण अरुण दातखिळे यांनी मंचर पोलीस स्टेशनला दिली होती, झालेली घोरपडी मोठी असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी सदरचा गुन्हा उघडकिस अन्याकरीता तपास पथकांची नेमणूक केली होती, तपास पथकांतील स.पो.नि. सुनील बंडगुजर व त्यांचे सोबतचे पोलीस कर्मचारी हे या गुन्ह्याचा तपास करीत असताना सदरचा गुन्हा हा मध्यप्रदेश येथील आरोपींनी केला असल्यांचे तपासात निष्पन्न झाले आहे, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सुनील बंडगुजर पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे पो. हवा संजय नाडेकर शेखर भोईटे रमेश नलावडे नंदकुमार आढारी प्रणयकुमार उकिडे शरद कुलवडे योगेश रोडे अजित पवार हनुमंत ढोबळे सुनील काठे प्रदीप गजे दळवी लखन माने आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.