राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन.
भोर प्रतिनिधी :सागर खुडे
भोर तालुका प्रहार अपंग क्रंती संघटना स्तःबरोबरच भोर आणि हर्ष फाउंडेशन यांच्या सहकार्याने मा.राज्यमंत्री श्री.बच्चुभाऊ कडू ५ जुलै रोजी असलेल्या त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले विशेषतः ३ दिव्यांग बांधवांनी रक्तदान केले या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपविभागीय अधिकारी मा.श्री राजेंद्र कचरे साहेब,उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.श्री.पांडुरंग दोडके,औंध हॉस्पिटलचे फिजिओथेरपिस्ट डाँ. श्री.संदीप चौधरी,डॉ. श्री.अतुल टाकसाळकर, डॉ.श्री.आशिष बुरांडे, सह्याद्री फोर्स अध्यक्ष श्री.सचिन देशमुख, हर्ष फाउंडेशनचे श्री.आप्पासाहेब घोरपडे, मौजे माझेरी गावचे सरपंच श्री.बाबू दिघे,भोर तालुका प्रहार संघटना अध्यक्ष श्री.बाप्पू कुडले, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तसेच तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री.विलास मादगुडे काका,महिला अध्यक्षा सौ.मनिषा ताई गायकवाड,न्हावी गावचे जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री.अजय कांबळे,सामाजिक कार्यकर्ते श्री.राहुल दगडे, श्री.माऊली बदक, श्री.रोहन भोसले, श्री.योगेश शेलार, सौ.मनीषाताई राजीवडे,भोर येथील मॉन्टेक टेक सर्व्हिसेस कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आयोजकांचा रोपवाटिका देऊन जाहीर सत्कार केला.
कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री.अभिषेक आवारे, श्री.विनय पलंगे, महिला वर्गामध्ये नम्रता वालगुडे, प्रगती चव्हाण, पूनम पोळ व प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष श्री.महेंद्र सोनावणे,
सचिव श्री.शांताराम खाटपे, संपर्कप्रमुख श्री.भानुदास दुधाणे, सरचिटणीस श्री.पांडुरंग दिघे मार्गदर्शक श्री.राजकुमार मोरे,विभागप्रमुख श्री.बापू धोंडे, श्री.राजेंद्र गव्हाणे,श्री.शिवाजी बदक, श्री.नितीन पवार,महिला उपाध्यक्षा सौ.संगीता शिवतारे, सौ.राणीताई शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.


