नाविण्यपूर्ण योजनेमधून आरोग्य व शिक्षण विभागावर निधी खर्च करणार! पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई ,ठाणे जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
दिलीप वाघमारे
राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या अध्यक्षतेखाली दि १३ जुलै रोजी ठाणे जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक ठाणे जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली. यावेळी ठाणे जिल्हा वार्षिक नियोजनाचा सन २०२३-२४ मधील खर्चाचा आणि २०२४-२५ मधील खर्च नियोजनाबाबत मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आढावा घेतला.
यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेब म्हणाले की, यावर्षी ठाणे जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन समितीला मंजूर नियतव्ययापेक्षा जास्तीचा वाढीव निधी देण्यात आलेला आहे. राज्यामध्ये ठाणे जिल्हा हा दुसऱ्या क्रमांचा जास्त निधी मिळणारा जिल्हा आहे. संभाव्य विधानसभा निवडणूक आचारसंहिता बघता, या वर्षीचा निधी वेळेवर खर्च झाला पाहिजे, यासाठी यंत्रणेमधील सर्व अधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन करावे, असे निर्देश मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी दिले. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही. त्यामुळे विहीत वेळेत सर्व निधी खर्च झाला पाहिजे. यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत. नाविण्यपूर्ण उपक्रमांमध्ये आरोग्य व शिक्षण विभागावर खर्च करण्यात यावा. तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या शाळांना आदर्श मराठी शाळा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी स्पष्ट केले. तसेच कोविड काळातील विनावापरामुळे पडून असलेल्या साहित्यांचा वापर करावा, अशी सूचनाही मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी दिली. याशिवाय लोकप्रतिनिधींच्या कामांच्या याद्या लवकरात लवकर सादर करण्याबाबत संबंधितांना याप्रसंगी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आवाहन केले.
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रवींद्रजी चव्हाण, खासदार मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे, मा. नरेशजी म्हस्के, विधान परिषद सदस्य मा. निरंजनजी डावखरे, आमदार मा. डॉ. बालाजी किणीकर, मा. गीताताई जैन, मा. संजयजी केळकर, मा. प्रमोदजी पाटील, मा. किसनजी कथोरे, मा. कुमारजी आयलानी, मा. दौलतजी दरोडा, शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, तसेच जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


