वाईत अघोरी प्रथेचा प्रकार अंनिस लक्ष घालणार का ? पोलिसांनी केली प्राथमिक चौकशी.


 

वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण

ADVERTISEMENT

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाचा नुकताच निकाल लागलेला आहे. असे असताना सातारा जिह्यात अघोरी प्रथेचा प्रकार स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला असून या प्रकरणात अंनिस लक्ष घालणार असल्याचे समजते. वाई तालुक्यातील वरखडवाडी येथे अज्ञातांनी खड्डा खोदून तिथे लिंब, बांगड्या ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या प्रकाराच्या अनुषंगाने वाई पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्याचे समजते आहे. दरम्यान, हा प्रकार कोणी केला असावा, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, ज्यांने हा प्रकार केला त्याच्यावर जादू टोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांचे कडून होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!