रविवार पेठेत जामा मशिद समोर मारामारी, वाई पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल :
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
तु समीर पटेल याला सोडायला का आलास असे म्हणत तीन जणांनी एकास रविवार पेठेतल्या जामा मशिदसमोर दि. 14 मे रोजी रात्री 8.15 वाजता लोखंडी रॉडने मारहाण केली. याचा गुन्हा दि. 17 मे रोजी दुपारी 3 वाजता वाई पोलीस ठाण्यात दिला आहे. जावेद सत्तार शेख वय 44 रा. रामडोहआळी याने दिलेल्या फिर्यादीवरुन मतिन करिम मुन्सी, सनी मतिन मुन्सी, राहत मतिन मुन्सी सर्व रा. पटेलवाडा रविवार पेठ यांनी समीर पटेल या सोडायला का आलास असे म्हणत लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यात तो जखमी झाला.


