राजगड पोलिसांची अवैध दारु विक्रीवर आळंदेवाडी येथे कारवाई.
सारोळे प्रतिनिधी :
ADVERTISEMENT
राजगड पोलिसांनी दि. 15 एप्रिल रोजी सायंकाळी 6:00 वा. सुमारास आळंदेवाडी तालुका भोर जिल्हा पुणे गावच्या हद्दीत दारु विक्री करणाऱ्यावर कारवाई केली. संदीप सोनबा शिर्के याच्यावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला असून 770 रुपयांच्या 11 दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या. याचा तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो.फौ. शिरसाठ करीत आहेत.


