भोर-राजगड मतदारसंघात 20 कामांसाठी 1 कोटी 26 लाखांचा निधी मंजूर:-आमदार शंकर मांडेकर
भोर: – पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पाठपुराव्यामुळे राजगड विधानसभेतील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांसाठी विकासकामांना मोठा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विविध गावांमध्ये मंदिरे, स्मशानभूमी, रस्ते, पाण्याच्या टाक्या व सामुदायिक सुविधा उभारण्यात येणार आहेत.
या योजनांतर्गत एकूण 20 विकासकामांना तब्बल 1 कोटी 26 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आमदार श्री. शंकर हiramण मांडेकर यांच्या प्रयत्नांना यश मिळून मतदारसंघातील नागरिकांसाठी ही महत्वाची कामे राबवली जाणार आहेत.
मंजूर झालेल्या काही महत्वाच्या कामांमध्ये समावेश:
२० कामांना १ कोटी २६ लक्ष निधी मंजूर
१) धानेप ता.राजगड येथिल पंचशिल नगर समाज मंदिर बांधकाम करणे
– ७ लक्ष रुपये
२) निगडे बु, ता.राजगड येथिल पंचशिलनगर अंतर्गत रस्ता करणे
– ५ लक्ष रुपये
3) कोशिमघर ता. राजगड येथिल सिद्धार्थनगर सिमेंट रस्ता करणे
– ५ लक्ष रुपये
4) कादवे ता. राजगड येथिल तेलावडे वस्ती पोहोच रस्ता करणे
– ५ लक्ष रुपये
५) साळव ता.भोर येथील भिमनगर अंतर्गत रस्ता करणे
– ५ लक्ष रुपये
६) किकवी ता.भोर येथील पंचशिलनगर समाज मंदिर बांधकाम करणे
– ७ लक्ष रुपये
७) उत्रौली ता.भोर येथील भिमनगर सिमेंट रस्ता व गटर बांधकाम करणे
– १० लक्ष रुपये
८) आंबवडे ता.भोर येथील गाडे व मोरेवस्ती अंतर्गत गाडे वस्ती पाणी टाकी व मोरे वस्ती पाणी टाकी बांधणे
६ लक्ष रुपये
२) पान्हवळ ता.भोर येथील रमाईनगर अंतर्गत रस्ता करणे
– ५ लक्ष रुपये
१०) कारी ता.भोर येथील सिध्दार्थनगर समाज मंदिर बांधणे
– ६ लक्ष रुपये
११) नांदगांव ता.भोर येथील समतानगर सिमेंट रस्ता करणे
– ५ लक्ष रुपये
१२) बाजारवाडी ता.भोर येथील सपकाळवस्ती सिमेंट रस्ता करणे
– ५ लक्ष रुपये
१३) वेनवडी ता.भोर येथील सिध्दार्थनगर सिमेंट रस्ता करणे
– ५ लक्ष रुपये
१४) जांबे ता.मुळशी येथील एकता नगर बंदिस्त गटर बांधकाम करणे
– ५ लक्ष रुपये
१५) नेरे ता. मुळशी येथील तक्षशिला नगर बंदिस्त गटर बांधकाम करणे
– ८ लक्ष रुपये
१६) शेडाणी ता.मुळशी येथील नांदिवली वडवाथर सिमेंट रस्ता करणे
– ८ लक्ष रुपये
१७) वडगाव ता.मुळशी येथील वाधवाडी सिमेंट रस्ता करणे
– ८ लक्ष रुपये
१८) हाडशी ताम ता. मुळशी येथील सिद्धार्थ नगर नगर हाडशी सिमेंट रस्ता करणे
– ८ लक्ष रुपये
१२) मांदेडे ता. मुळशी येथील शेळकेवस्ती सिमेंट रस्ता करणे
– ५ लक्ष रुपये
२०) काशिग ता.मुळशी येथील समतानगर काशिग सिमेंट रस्ता करणे- ८ लक्ष रुपये
तसेच विविध वस्त्यांमध्ये रस्ते, पाण्याच्या टाक्या व समाजमंदिरे उभारली जाणार आहेत.
या निधीमुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध होऊन नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
आमदार शंकर हिरामण मांडेकर यांनी सांगितले की,
“हा निधी मंजूर करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार. आमच्या भोर,राजगड मतदारसंघातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करून समाजाच्या विकासाला गती मिळणार आहे.”


