वाठार स्टेशन पोलिसांकडून एक लाख 80 हजार किंमतीचे १० मोबाईल हस्तगत :- वाठार स्टेशन पोलिसांची दमदार कामगिरी
प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी
कोरेगांव विभागातील वाठार पोलीस ठाण्याच्या परिसरांतून आठवडा बाजारांत मोबाईल फोन चोरीला जाण्यांसह,गहाळ होण्याचे,हरविण्याचे प्रमाण चांगलेच वाढले होते, याबाबत नागरिकांनी आपल्या चोरीस गेलेल्या मोबाईलच्या तक्रारी वाठार पोलीस ठाण्यात दाखल केल्या होत्या, त्या अनुषंगाने वाठार पोलीस ठाणेकडील अधिकारी अंमलदार (डी. बी) पथकांने कसून तपास करून जवळपास १ लाख ८० हजार रुपये किंमतीचे गहाळ झालेले १० मोबाईल शोधण्यात वाठार पोलिसांना यश आले आहे, वाठार पोलीसांच्या कामगिरीचे परिसरांतून विशेष कौतुक होत आहे.
वाठार पोलीस ठाण्याच्या इतिहासामध्ये आजपर्यंत अनेक अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उत्कृंष्ट सेवा दिली, सध्या वाठार पोलीस ठाण्याचे नवनियुक्त
सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांनी मागील काही दिवसांपूर्वीच वाठार पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे, पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आपल्या सहकाऱ्यांसमवेत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत, वाठार पोलिसांच्या परिसरांतील काही नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोध घेण्यासाठी वाठार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण (डी. बी.) पथकांस सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने डी.बी. पथकांतील पोलीस स्टाफने सी. ई. आय. आर पोर्टल व इतर
तांत्रिक बाबीचे आधारे महाराष्ट्र व इतर राज्यांत हस्ते परहस्ते मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क करुन शोध मोहिम राबविल्याने वाठार पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले एकुण १,८०,०००/- रुपये किंमतीचे एकुण १० मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल-डुडी उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाणेचे स.पो.नि. पोलीस निरीक्षक अविनाश माने, गुन्हे प्रकटीकरण पथकांचे पोलिस उपनिरिक्षक गहिणीनाथ सातव,नितीन भोसले,पोलिस हवालदार तानाजी चव्हाण,प्रकाश चव्हाण,आरती पवार,गणेश इथापे,प्रतिक देशमुख आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग नोंदविला होता,


