भोर पंचायत समिती सभापतीपदी मनीषा कंक तर उपसभापतीपदी विशाल कोंडे यांची निवड


मंगेश पवार

भोर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत सोमवारी मोठी राजकीय रंगत पाहायला मिळाली. अखेर चिठ्ठी पद्धतीने झालेल्या निर्णयात सभापतीपदी मनीषा कंक तर उपसभापतीपदी विशाल  कोंडे यांची निवड झाली.

भोर पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी चार सदस्य निवडून आले असल्याने सभापती व उपसभापती पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. मतदान प्रक्रियेनंतरही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने अखेर चिठ्ठी पद्धतीचा अवलंब करण्यात आला.

ADVERTISEMENT

या चिठ्ठी पद्धतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना यश मिळाले. त्यामुळे सभापतीपदी मनीषा कंक तर उपसभापतीपदी विशाल कोंडे यांची निवड निश्चित झाली.

या निवडीमुळे भोर तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!