रक्षाबंधन – सातारा कारागृहात महिला बंदयांनी तयार केल्या राख्या.


प्रतिनिधी: संभाजी पुरी गोसावी

बहिण भावाचा गोड दिवस म्हणजे… रक्षाबंधन आता काहीच दिवसांवर येवुन ठेपला आहे, याच अनुषंगाने सातारा जिल्हा

कारागृहातील महिला बंद्यांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने या विचारणे पुणे विभागांच्या कारागृह उपमहानिरीक्षक, स्वाती साठे मॅडम यांनी ही एक संकल्पना आणून माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांच्या सहकार्यातून सातारा कारागृहातील महिला बंद्यांना राखी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियोजन जिल्हा कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी केले.

ADVERTISEMENT

यामध्ये माणदेशी फाउंडेशन, शाखा सातारा येथील प्रोग्रॅम डायरेक्टर अपर्णा सावंत यांच्या योजने अंतर्गत महिला बंद्यांना रक्षाबंधनचे औचित्य साधून राखी प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण ट्रेनर जया काळे, धनश्री पवार यांनी दिले.

सदर प्रशिक्षणामध्ये कारागृहातील सर्व महिला बंद्यांनी 200 हून अधिक आकर्षक व सुबक राख्या तयार केल्या.

सदर राखी तयार करण्याच्या प्रशिक्षणाप्रसंगी अपर्णा सावंत, ट्रेनर जया काळे, धनश्री पवार, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर दुबे, राजेंद्र भापकर, महिला शिपाई गीता दाभाडे, जयश्री पवार, मीनाक्षी जाधव, माधुरी वायकर, ज्योती शिंगरे, रूपाली नलावडे, अंकिता करपे, प्रतीक्षा मोरे आदींची यावेळी उपस्थिती होती,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!