शाहू विद्यामंदिर आंबेगाव पुणे येथे “लेखिका आपल्या भेटीला “अनोखा कार्यक्रम साजरा.
कार्यकारी संपादक : सागर खुडे
पुणे : महात्मा फुले विद्या प्रतिष्ठान संचलित राजर्षि शाहू विद्या मंदिर आंबेगाव बु।। पुणे विद्यालयात “‘लेखिका आपल्या भेटीला ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला जसा दिस आज आनंदाचा आला भाणि नीलिमा ताई आल्या आमच्या भेटीला. या ओळी प्रमाणे लेखिका डॉ नीलिमा ताई यांनी १० वी च्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे शब्द गंमतीची समर्पक उदाहरणे व दाखले देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज साधले.
या अनोख्या जगामध्ये कवी हाच प्रजापती म्हवाजेच ब्रम्हदेव आहे कारण कवी स्वत हवं तसं जग निर्माण करतो आणि मनाप्रमाणे त्यात रंग भरतो,ही सारी शक्ती यांच्या कल्पनेमध्ये असते हे नीलिमा लाई यांनी आपल्या मौलिक विचारातून दाखवून दिले.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी नीलिमा ताईच्या छान छान कविता सादर केल्या. यामध्ये ‘गाडी गाडी’, मी होईन मोबाईल ‘या बालकविता व लेखिका अरुणा ढेरे यांनी लिहिलेल्या नाटकाची छोटीशी नाट्यछटा सादर करण्यात आली.या सर्व कार्यक्रमाचे उत्तम सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख पाहुण्या लेखिका डॉ. नीलिमा गुंडी, अध्यक्ष अंकलकोटे सर, विद्यालयाचे प्रेरणा स्थान असलेले माजी आमदार मा. उल्हास पवार उपस्थित होते तसेच विद्यालयाचे संस्था संचालक मा उत्तमराव चव्हाण, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. साने मिनल मराठी विषयाच्या शिक्षिका रूपाली मारुलकर व गावडे विमल, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. १०वी च्या विद्यार्थीनींनी केले. या कार्यक्रमासाठी
मा.श्री हर्षद बोबडे सर, प्रमोद डंबरे, मगरध्वज,राणी घुले,श्रीदेवी आलुरे,रूतुजा, कासार, देशमाने, व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.


