महाबळेश्वर मध्ये दाट धुक्याचा अंदाज न आल्याने कार दरीत कोसळली! सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.


 

सातारा महाबळेश्वर : दिलीप वाघमारे

 

महाबळेश्वर तापोळा रोडवरील भारत हॉटेल जवळील दाट धुक्याचा अंदाज न आल्याने हुंडाई क्रेटा कार थेट अंदाजे २० फुट दरीत कोसळली. सुदैवाने कोणतिही जिवीत हानी झाली नाही..मोटारीतील चालक व इतर प्रवासी सुखरूप बचावले. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ .३० दरम्यान घडली. पाऊस व दाट धुके असल्याने भारत हॉटेल पुढे महाबळेश्वर कडे येत असताना वळणाचा अंदाज न आल्यामुळे सदरची घटना घडली. वाहन दरीत कोसळून पलटी झाले सुदैवाने चालक रमेश सांळुखे रा. इस्लामपुर यांच्या सह एक पुरुष, दोन महिला व तीन लहान मुले होती. सदर वाहन क्र एम् एच् ४७ बी के ३५४० हुंडाई क्रेटा कंपनीचे आहे. सदर वाहन क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. या मदत कार्यात महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस जितेंद्र कांबळे व सलिम सय्यद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ADVERTISEMENT

महाबळेश्वर येथे पावसाचे आगमन झाले असून धुक्याचे व पावसाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रस्त्यावरील धोकादायक वळणाचा अंदाज न आल्यामुळे अपघातास निमंत्रण दिले जाते. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर बाबीची दखल घेऊन अशा धोकादायक वळणावर रिफलेक्टर तसेच संरक्षक कठडे बांधावेत अशी मागणी महाबळेश्वर नागरिक व पर्यटक करित आहेत. या पुढे अशा दुर्घटना होऊ नयेत याची दखल महाबळेश्वर सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी.

सध्या पावसाळी हंगाम सुरू होत आहे. पावसाळी हंगामात धुक्याच्या वातावरणात व रात्री अपरात्री वाहने चालवताना पर्यटकनागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढऱ्या रंगाची साईट पट्टी तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही अंतरावर रिफ्लेक्टर बसवणे अत्यंत आवश्यक असताना देखील महाबळेश्वर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून वाहनांचाप्रवासाच्या सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून सदरची कामे केलेली दिसून येत नाहीत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!