स्वातंत्र्य दिनानिमित्त सरपंच गणेश साळुंके यांचा उपक्रम — विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व साहित्यिक साधनांचे वाटप
मंगेश पवार
सारोळे :- भोर, ता. 15 ऑगस्ट — स्वातंत्र्य दिनानिमित्त भोर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत एक विशेष उपक्रम राबविण्यात आला. विद्यमान सरपंच गणेश साळुंके यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत सावरदरे मार्फत विद्यार्थ्यांना दोन 43 इंची टीव्ही, संगणकांसाठी दोन यूपीएस, तीन साऊंड सेट, मोठा स्पीकर बॉक्स, तसेच शालेय बॅग, प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्सचा ड्रेस, शालेय दप्तर आणि खाऊ देण्यात आला. याशिवाय देणगी स्वरूपात साडे पाच हजार रुपये जमा करण्यात आले.
सरपंच गणेश साळुंके आणि ग्रामविकास अधिकारी सोनावणे यांनी सांगितले की, “गावातील मुलांना चांगले शिक्षण आणि आधुनिक सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. आजचा हा उपक्रम त्याचाच एक भाग आहे.”
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, ग्रामपंचायत सदस्य, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सरपंचांच्या या कार्याचे मनापासून कौतुक केले.
विद्यार्थ्यांसाठी केलेल्या या उपक्रमाबद्दल सर्वांच्या सहकार्याबद्दल सरपंचांनी मनःपूर्वक आभार मानले.


