सातारा ते पुणे महामार्गावर सारोळे येथे ट्रकची मोटरसायकलला धडक! तरुणाला गंभीर दुखापत.


सारोळे : सातारा ते पुणे महामार्गावर दि. २० रोजी देसाई कंपनीच्या बाजूला विठू माऊली हॉटेलच्या समोर ट्रकने मोटरसायकलला धडक दिली.

यामध्ये मोटर सायकलस्वार शंकर बापूसो निकम वय २४ गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील ट्रक प्लास्टिक दाना भरून मुंबईला जात असताना सातारा ते पुणे महामार्गावर सारोळे हद्दीत देसाई कंपनीच्या समोर ट्रॅक नं. के ए २५ ए बी ६०८४

याने मोटरसायकलला धडक दिली असून यामध्ये मोटरसायकल चालक गंभीर स्वरूपात जखमी झाला आहे.

ADVERTISEMENT

राजगड पोलिसांनी शंकर निकम या युवकाला सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे हलवले आहे. यावेळी सातारा पुणे रोडवर लांबच्या लांब गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. राजगड पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक मदने नाना आणि मयूर निंबाळकर यांनी वाहतुक सुरुळीत केली.

यावेळी राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस मित्र आणि ॲम्बुलन्स चालक तुळशीराम आहिरे यांनी जखमी तरुणाला दवाखान्यामध्ये लवकर दाखल केल्याने जखमी तरुणाचे प्राण वाचले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!