सलग ११ वर्षे पालखीमध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉ. मंदार माळी यांचे मोलाचे योगदान


पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

संपादक मंगेश पवार

कार्यकारी संपादक सागर खुडे

दि. 24सासवड – लाखो भाविकांच्या श्रद्धेचा व मनोभावे चालणाऱ्या वारीचा महत्त्वपूर्ण भाग म्हणजे वैद्यकीय सेवा. याच सेवेत गेली अकरा वर्षे अखंड आणि निस्वार्थपणे योगदान देत असलेले डॉ. मंदार माळी (किकवी, ता.भोर, जि. पुणे) हे एक मानाचं स्थान निर्माण करत आहेत.

 

बीव्हीजी १०८ रुग्णवाहिका सेवेमार्फत डॉ. मंदार माळी व त्यांच्या सोबत पायलट दामोदर अहिरे यांनी यावर्षीही संत तुकाराम महाराज व संत सोपान काका महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत वारकऱ्यांसाठी मोफत आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवली.

 

पहिल्या दिवसाचा आरोग्य सेवा अहवाल:

 

सासवड येथून पांढरे मुक्कामाच्या पहिल्या दिवशी

 

३ तातडीच्या रुग्णांना तत्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली.

 

६० रुग्णांना ओपीडीद्वारे उपचार देण्यात आले.

 

या उपचारांमध्ये प्रामुख्याने

 

सर्दी, ताप, खोकला,

 

पाय दुखी, कंबर दुखी, अंगदुखी

या सामान्य पण वारकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या समस्यांवर औषधे व सल्ला देण्यात आला.

 

 

चालता-चालता सेवा:

ADVERTISEMENT

 

डॉ. मंदार माळी यांचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त रुग्णवाहिकेतून सेवा न देता, स्वतःही वारकऱ्यांबरोबर चालत चालत पालखीत सहभागी होतात. वाटेत जेव्हा कोणालाही काही त्रास होतो, तेव्हा तात्काळ थांबून प्राथमिक उपचार देतात. ही सेवा मुक्कामाच्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत चालू असते.

 

वारकऱ्यांच्या मनात विश्वास:

 

अकरा वर्षांची ही सेवा केवळ औपचारिकता नसून एक श्रद्धा बनली आहे. “डॉक्टर माळी आले की आम्ही निश्चिंत असतो,” असं म्हणणारे अनेक वारकरी त्यांचं नाव श्रद्धेने घेतात.

 

सामाजिक योगदान:

 

डॉ. माळी यांचं हे कार्य केवळ वैद्यकीय सेवा देणं नाही, तर ती एक सामाजिक जबाबदारी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, भर पावसात भिजत, उन्हातान्हात, धुळीमातीत काम करत असतानाही त्यांनी वारकऱ्यांसाठी सेवा देणं कधीही थांबवलं नाही. त्यांच्या या कार्याला विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक मिळत आहे.

वारकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी ज्या पद्धतीने डॉ. मंदार माळी पार पाडत आहेत, ते समाजासाठी आदर्श ठरणारे आहे. अशा सेवाभावी व्यक्तिमत्त्वांना सलाम!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!